जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने*
![]()
*जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने*
___________________________
#जळगाव : *पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पाशवी बहुमताच्या आधारावर जन सुरक्षा विधेयक पास करण्यात आले.* *याच्या विरोधात समविचारी संघटनाच्या माध्यमातून मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली*
*जन सुरक्षा विधेयक म्हणजेच जनतेची मुस्कटदाबी करणारे विधेयक आहे. जनतेचा आवाज आणि जनतेची अभिव्यक्ती दाबण्याचा हा प्रयत्न आहे. नक्षलवाद केवळ भामरागड तालुक्यामध्ये शिल्लक आहे, असे खुद्द मुख्यमंत्री सांगत असताना देखील नक्षलवाद संपवण्यासाठी सदर कायदा आणला असा धादांत खोटा समज पसरवून जन सुरक्षा विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास करण्यात आले. हा कायदा म्हणजे डाव्या संघटनांना डाव्या विचाराच्या लोकांना आणि आंबेडकरी चळवळीला संपवण्याचा कुटिल डाव आहे. *इंग्रजांच्या काळामध्ये *असणारा रौलेट कायदा जसा काळा कायदा होता, तसा जन सुरक्षा विधेयक हा काळा कायदा आहे.* *आणि हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी १५ जुलै मंगळवारी दुपारी ११:३० वा.*जिल्हाधिकारी कार्यालयासमोर *महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने, व समविचारी संघटनांच्या वतीने* *मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने करण्यात येऊन एक निवेदन महामहीम राज्यपाल महोदय यांना जिल्हाधिकारी व्दारा सदर निवेदन देण्यात आले.**
*यावेळी जयसिंग वाघ यांनी सदर कायद्याच्या विरोधात* *न्यायालयीन लढाई लढली पाहिजे, असे प्रतिपादन केले.* *चेतन नन्नवरे यांनी या कायद्याच्या विरोधात शेतकरी कष्टकरी जनतेची कशी पिळवणूक होणार आहे हे सांगत असताना वास्तव शिक्षण पद्धतीचे भीषण चित्र मांडले. त्याचबरोबर संविधान संमेलन घेण्याच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका जळगावातील संविधान प्रेमी जनतेने घ्यावी, असे आव्हान देखील केले,* *याप्रसंगी सत्यजित साळवे,मनोहर गाडे, जय वाघ,ॲड.डी.एस. भालेराव, सुभाष सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केली.*
*या बैठकीला संजय बागुल, पितांबर अहिरे, वाल्मीक जाधव, अजय बिऱ्हाडे,सचिन बि-हाडे, सुनील सपकाळे, सोमा भालेराव, संजय सोनवणे, महेंद्र केदारे ,सिद्धांत गव्हाणे, दिनेश सोये, भारत सोनवणे, सोमा भालेराव, दत्तू सोनवणे, वशीम शेख, दिलीप सपकाळे, भैय्या सपकाळे, जगदीश सपकाळे, प्रा किसन हिरोळे, आधार सपकाळे गुरुजी इत्यादी पुरोगामी संघटनांचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

