यशस्वी वकिलीपासून संसदपर्यंत–चित्रात साकारली उज्वल झलक!  कलेतून कृतज्ञता: यश महाजन यांचं प्रेरणादायी चित्रांकन!
1 min read

यशस्वी वकिलीपासून संसदपर्यंत–चित्रात साकारली उज्वल झलक! कलेतून कृतज्ञता: यश महाजन यांचं प्रेरणादायी चित्रांकन!

Loading

यशस्वी वकिलीपासून संसदपर्यंत–चित्रात साकारली उज्वल झलक!

कलेतून कृतज्ञता: यश महाजन यांचं प्रेरणादायी चित्रांकन!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि देशभरात आपल्या निर्भीड वक्तृत्वामुळे ओळख निर्माण केलेले अँड. उज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून, विविध स्तरांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या शुभेच्छांचा एक अनोखा आणि भावनिक प्रत्यय आला तो श्री वाणी विद्यालय हायस्कूल, कल्याण पश्चिम येथील कलाशिक्षक व “कलाभूषण” पुरस्कारप्राप्त यश महाजन यांच्या सृजनातून. यश महाजन यांनी अँड. उज्वल निकम यांचे केरी स्केच जलरंग माध्यमात साकारून त्यांना शुभेच्छा दिल्या. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना अवघे दीड ते दोन तास लागले. मात्र त्या काही तासांत त्यांनी साकारलेली कलाकृती नेटकऱ्यांच्या आणि कलाप्रेमींच्या विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
या चित्रात उज्वल निकम यांचा तेजस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण चेहरा अत्यंत नाजूक आणि वास्तवदर्शी शैलीत रेखाटण्यात आला आहे. हे चित्र केवळ एक पोर्ट्रेट नसून, एका कलाकाराच्या मनातील आदरभावाचे प्रतीक ठरत आहे.
सध्या या कलाकृतीचे सोशल मीडियावरही जोरदार कौतुक होत असून, यश महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या उपक्रमातून चित्रकला हे समाजाशी, आणि विशेषतः समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांशी जोडणारे प्रभावी माध्यम ठरू शकते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
अँड. उज्वल निकम यांना त्यांच्या नव्या राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा, आणि यश महाजन यांना त्यांच्या कला योगदानासाठी मनःपूर्वक अभिनंदन!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *