नांदेड येथे होणार २० वे समरसता साहित्य संमेलन*  *साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची अध्यक्षपदी निवड*
1 min read

नांदेड येथे होणार २० वे समरसता साहित्य संमेलन* *साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची अध्यक्षपदी निवड*

Loading

*नांदेड येथे होणार २० वे समरसता साहित्य संमेलन*

*साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची अध्यक्षपदी निवड*

जळगाव : समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले यावर्षीचे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी होत असलेले हे २० वे साहित्य संमेलन आहे अशी माहिती समरसता साहित्य परिषदेचे देवगिरी प्रांत कार्यवाह नरेंद्र निकुंभ यांनी दिली.
अधिक माहिती देतांना श्री निकुंभ म्हणाले की,समरसता साहित्य परिषदेने गेल्या अनेक वर्षांत समतावादी,मूल्याधिष्ठित व सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणाऱ्या विचारप्रधान साहित्य परंपरेची जपणूक केली आहे. हीच परंपरा या २० व्या संमेलनातून वृद्धींगत होईल.
हे संमेलन श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्यनगरी,भक्ती लॉन्स, मालेगाव रोड,नांदेड येथे होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्यसभा सदस्य खा. डॉ.अजित गोपछडे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे उद्घाटन वंदनीय भदंत डॉ.राहूल बोधी महाथेरो (अध्यक्ष,ऑल इंडिया भिक्खू महासंघ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किशोर मकवाणा (अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, भारत सरकार) हे उपस्थित राहणार आहेत. सुमारे ६०० हून अधिक साहित्यिक,लेखक,कवी, विचारवंत व साहित्यरसिक महाराष्ट्रभरातून या संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून त्यास उत्कृष्ठ प्रतिसाद मिळत आहे.
संमेलन यशस्वी व्हावे यासाठी विविध समित्याही गठित करण्यात आल्या आहेत.
संमेलनाच्या नियोजनासाठी समरसता साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे ठरत आहे. तर कार्यवाह माणिक भोसले, निमंत्रक शिवा कांबळे, सहनिमंत्रक डॉ.माया गायकवाड, प्रा.डॉ.धनंजय भिसे,डॉ.राजेश कापसे,महाव्यवस्थापक अभय कोटलवार, सहव्यवस्थापक राजेश मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती श्री नरेंद्र निकुंभ यांनी दिली.

*अध्यक्षांचा परिचय*
या संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव चं. कांबळे हे ज्येष्ठ साहित्यिक,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व ‘राघववेळ’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *