साहित्य-संवेदनशीलतेची पाठशाळा ठरलेल्या अनुपमा जाधव यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार’; त्र्यंबकेश्वर येथे गुरु पौर्णिमेच्या दिवशी गौरव” डहाणू एज्युकेशन ट्रस्टकडून व मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांकडून प्रेरणादायी शिक्षिकेला सन्मानाची शाल व शब्दसुमने
![]()
“साहित्य-संवेदनशीलतेची पाठशाळा ठरलेल्या अनुपमा जाधव यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार’; त्र्यंबकेश्वर येथे गुरु पौर्णिमेच्या दिवशी गौरव”
डहाणू एज्युकेशन ट्रस्टकडून व मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांकडून प्रेरणादायी शिक्षिकेला सन्मानाची शाल व शब्दसुमने
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
साहित्य, शिक्षण व सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आपली अमीट छाप उमटवणाऱ्या डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के. एल. पोंदा हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका आणि कवयित्री सौ. अनुपमा जाधव यांना १० जुलै रोजी, गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ‘खान्देश रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. परमपूज्य ब्रह्मलीन सच्चिदानंद गुरु भगवान यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात त्यांचा सन्मान शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सौ. अनुपमा जाधव या केवळ एक शिक्षक नसून त्या एक संवेदनशील कवयित्री, कुशल साहित्यिका व सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या ‘समुद्र संगीत’, ‘वहिवाट’, ‘रानझरा’ या काव्यसंग्रहांसह ‘अनुबंध’ हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रबोधनासाठी त्यांनी लिहिलेलं गीत डहाणू नगरपरिषदेच्या घंटागाडीवरही प्रसारित झालं आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना यापूर्वीही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

या गौरवाच्या निमित्ताने दहाणू एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. तरुण पोंदा सर, उपाध्यक्ष मा. श्री. अजयजी बाफना सर, मानद सचिव श्री. सुधीर कामत सर, प्राचार्य श्री. सोपान इंगळे सर, कॉलेजचे उपप्राचार्य श्री. शशिकांत चव्हाण सर, उपमुख्याध्यापिका सौ. रसिका घागस मॅडम, पर्यवेक्षक श्री. सुनील मोरे सर, पर्यवेक्षिका सौ. मनिषा पटेल मॅडम तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. अनुपमा जाधव यांचा हा पुरस्कार त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याची पावती ठरला असून, शिक्षण व साहित्य या क्षेत्रातील नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.


