हिंदी भाषेच्या अभिमानाचा ठसा – के.एल. पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल, अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!”
1 min read

हिंदी भाषेच्या अभिमानाचा ठसा – के.एल. पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल, अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!”

Loading

हिंदी भाषेच्या अभिमानाचा ठसा – के.एल. पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल, अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शब्दांचं सामर्थ्य जेव्हा शिक्षणाच्या दिशेने वाहू लागतं, तेव्हा निर्माण होतो यशाचा अभूतपूर्व इतिहास. दी डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के.एल. पोंदा हायस्कूलने अशाच इतिहासाचा साक्षीदार होत हिंदी भाषा परीक्षेत शंभर टक्के निकाल साधून दाखवला आहे.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे – मुंबई विभागीय समितीमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचे यश हिंदी विभाग प्रमुख सौ. अनुपमा जाधव यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनात आणि आत्मीय मार्गदर्शनात सामावले आहे. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग यांनी परीक्षेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परीक्षेचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन अनुपमा जाधव यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. तरुण पोंदा, उपाध्यक्ष मा. श्री. अजय बाफना, मानद सचिव मा. श्री. सुधीर कामत, मुख्याध्यापक मा. श्री. सोपान इंगळे, उपमुख्याध्यापिका मा. सौ. रसिका घागस, पर्यवेक्षक मा. श्री. सुनिल मोरे, पर्यवेक्षिका मा. सौ. मनिषा पटेल आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

साहित्याशी जोडलेली सामाजिक बांधिलकी

अनुपमा जाधव केवळ परीक्षेपुरत्या मर्यादित नसून, त्या हिंदी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यातही सक्रिय आहेत. मुंबई विभागीय कार्यालयातर्फे विविध १०० ते १५० हिंदी साहित्याची पुस्तके शाळेला उपलब्ध करून दिली गेली आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि साहित्याची गोडी निर्माण होत आहे.
माजी मुख्याध्यापक मा. श्री. मनोहर ओझा यांनीही शाळेच्या यशाला शुभेच्छा देत या परीक्षेतील सहभाग आणि मार्गदर्शनासाठी कौतुकाची थाप दिली आहे.

भाषा ही केवळ अभिव्यक्ती नाही, ती संस्कृतीची शिदोरी आहे”–अनुपमा जाधव

त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे शाळा ही केवळ शिक्षणसंस्था न राहता, हिंदी भाषेच्या जागृतीचं केंद्र बनली आहे. दरवर्षी शाळेतून विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग आणि उत्तम निकाल, हे त्यांच्या कार्याची बोलकी साक्ष आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *