“असोदा सार्वजनिक विद्यालयात ‘टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी’; पर्यावरण जागृतीसाठी ग्रामस्थांत सकारात्मक संदेश”
![]()
“असोदा सार्वजनिक विद्यालयात ‘टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी’; पर्यावरण जागृतीसाठी ग्रामस्थांत सकारात्मक संदेश”
जळगांव प्रतिनिधी
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आज टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडीत संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, संचालक उद्धव पाटील मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, हरित सेना प्रमुख गोपाळ महाजन शाळेचे सर्व शिक्षक, व विद्यार्थी सहभागी झाले.तसेच वृक्षदिंडी साठी हभप डालेंद्र महाराज, धिरज महाराज, श्रीराम मंदिर संस्थानचे पदाधिकारी श्री गोपाळ भोळे, अशोक भोळे, पुंडलिक नारखेडे, वासुदेव चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
ही वृक्षदिंडी गावातील मुख्य मार्गावरून फिरली आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश या दिंडीद्वारे देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.
यावेळी, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. वृक्षदिंडीमुळे गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जाणीव जागृत झाली.
वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात विविध प्रकारची झाडे, फलक आणि घोषणा फलक होते. या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वृक्ष दिंडी नंतर शालेय परिसरात ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमांतर्गत विशाखा भोळे या विद्यार्थिनी व तिची आई हर्षा भोळे यांच्या हस्ते शाळेत वृक्ष लागवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, संचालक उद्धव पाटील, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल. जे ,हरित सेना प्रमुख गोपाळ महाजन, मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन भावना चौधरी, प्रशांत कोल्हे,उदय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

