साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलम्पियाड परीक्षा संपन्न राजभाषा हिंदी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद – १५५ विद्यार्थिनींचा सहभाग
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलम्पियाड परीक्षा संपन्न
राजभाषा हिंदी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद – १५५ विद्यार्थिनींचा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी:
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी परीक्षा दिनांक 12/ 7 /2025वार शनिवारी संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब श्री .संदीप घोरपडे सर हे होते . शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या .साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून परीक्षा घेत असून यावर्षी एकूण 155 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या . परीक्षेची तयारी व मार्गदर्शन हिंदी विषय शिक्षक श्री . दिलीप पाटील सर यांनी केले . परीक्षा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री . मुकेश पाटील व श्री . दीपक महाजन यांचे सहकार्य लाभले . संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री . आबासाहेब हेमकांत पाटील व सर्व ज्येष्ठ संचालक यांनी शुभेच्छा दिल्या .

