महेश मेगा मार्ट अचानक बंद – ग्राहकांमध्ये नाराजीची लाट!
![]()
महेश मेगा मार्ट अचानक बंद – ग्राहकांमध्ये नाराजीची लाट!
अमळनेर, प्रतिनिधी:(ईश्वर महाजन)
शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील लोकप्रिय ‘महेश मेगा मार्ट’ अचानक बंद पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंदडा नगर, सुरभी कॉलनी, शिव कॉलनी, मराठा मंगल कार्यालय व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो ग्राहक या दुकानावर अवलंबून होते.
ग्राहकांची पसंती असलेले हे ठिकाण परवडणाऱ्या दरात व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी ओळखले जायचे. येथे काम करणारे कर्मचारी व मालक यांचा ग्राहकांशी स्नेहपूर्ण व आदरयुक्त व्यवहार होता, त्यामुळे येथे येणाऱ्यांची विश्वासार्हता निर्माण झाली होती.
पण अचानक दुकान बंद झाल्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये नाराजी व संभ्रमाचे वातावरण आहे. लोक विचारत आहेत – “आता आम्ही कुठे जाऊ?”
महेश मेगा मार्ट बंद पडण्यामागचे कारण सांगताना मालकांनी स्पष्ट केले की,> “दुकानाचा करार संपलेला आहे, भाडे खूप वाढले आहे, तसेच वीजबिल, मजुरांचा पगार आणि अन्य खर्च परवडत नाहीत. त्यामुळे दुकान बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.”
या निर्णयामुळे शहरातील एक विश्वासार्ह व्यवसाय बंद झाला असून, ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांमध्ये एकच चर्चा – महेश मेगा मार्ट पुन्हा सुरू होईल का?


