रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी
1 min read

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी

Loading

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी

अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेर च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण १ जुलै रोजी रोटरी हॉल येथे झाला.
नूतन अध्यक्ष म्हणून रो. देवेद्र कोठारी तर सचिव म्हणून रो.आशिष चौधरी यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात झाले. मावळते अध्यक्ष रो.ताहा बुकवाला व सचिव रो.विशाल शर्मा यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या विविध प्रोजेक्टची वर्षभराची माहिती दिली, मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा सादर केला तसेच या वेळी संघटनेच्या पुढील कार्यकाळ २०२५ -२६ साठी नूतन अध्यक्षपदी रो. देवेंद्र कोठारी तर सचिव पदी रो.आशिष चौधरी यांची निवड एक मताने करण्यात आली. नवीन पदाधिकारी निवड बैठकीत सचिव रो.आशिष चौधरी म्हणाले, मला संस्थेचे सचिवपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले ,मात्र, सर्वांना समवेत घेत चांगले काम करू नवीन वर्ष वर्षात मोठे प्रोजेक्ट घेण्यासाठी प्रयत्न करू रोटरी क्लब अमळनेर इतरांना सेवा प्रदान करण्यासाठी, सचोटीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक, सामाजिक, सद्भावना आणि शांतता वाढविण्यास वचनबद्ध आहे. प्राथमिक लक्ष सेवा प्रदान करणे, नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि समुदाय सहभाग वाढवणे यासारख्या व्यापक वर्गीकरणांवर आहे. प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये सेवा प्रकल्पांचे आयोजन करणे, समुदाय विकासात सहभागी होणे आणि व्यवसाय आणि व्यवसायांमध्ये नैतिक मानकांना प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. शांतता वाढवणे, रोगांशी लढणे, स्वच्छ पाणी पुरवणे, शिक्षणाला पाठिंबा देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था वाढवणे यावर देखील लक्ष केंद्रित करतात.
| अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् । अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ॥

नवनिर्वाचित अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी यांनी येणाऱ्या वर्षात रोजगार मेळावा, शेतकरी मेळावा, वृक्षारोपण, वैदकीय शिबिरे, एड्स प्रोटीन किट, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा, कौशल्य विकास, बाल व माता संगोपन सहाय्य प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जातील, असे सांगितले. समजो रोटरी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाज विधायक कामे करत आली. परिपूर्ण अमळनेरचे आश्वासक पाऊल पुढे पडते आहे. पक्ष व राजकारण विरहित ही संघटना असल्यानेच विविध क्षेत्रातील नागरिक यात सहभागी होत आहेत.
या वेळी रो.विनोद भैय्या पाटील – तुम्हाला क्लबच्या संचालक मंडळ पदी निवड झाल्याबद्दल अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की तुमचे योगदान क्लबच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल. यांनी नवीन पदाधिकाऱ्यां शुभेच्छा दिल्या. सचिव रो.आशिष चौधरी यांनी सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *