“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!”
![]()
“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
केवळ वाढदिवस नव्हे, तर पर्यावरणासाठी एक आनंदसोहळा! के.एल. पोंदा हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका, कथाकार व पर्यावरणप्रेमी अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध सामाजिक व हरित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून शाळेला भेट दिली जाई, जुई, गुलाब, मोगरा, गवती चहा, बेल, आंबा, सिताफळ अशा असंख्य फुलझाडांची. फुलांइतकीच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या उपक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव श्री. सुधिरभाई कामत, अध्यक्ष तरुणभाई पोंदा, उपाध्यक्ष अजयजी बाफना यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अनुपमा जाधव या केवळ शिक्षिका नसून समाजहितासाठी झपाटून काम करणाऱ्या एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहेत. “एक विद्यार्थी – एक झाड”, “एक झाड आईच्या नावाने”, घरगुती खतनिर्मिती, निर्माल्यापासून झाडे तयार करणे, आणि पर्यावरणविषयक कविता, कथा, कार्यक्रमांमधून त्यांनी एक वेगळीच हरित ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कवितेत जसे ते म्हणतात :
“जिथे जिथे असेल माती, तिथे तिथे झाड लावू!”
तसंच त्यांनी कृतीतून साकारलं!


