माळशेवगे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रा. सुनील पाटील
![]()
माळशेवगे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रा. सुनील पाटील
अमळनेर – येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. सुनील दयाराम पाटील यांची पदोन्नतीने माळशवगे (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची प्रशासनातील कार्यकुशलता व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम यांची दखल घेत नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी प्रा. पाटील यांची मुख्याध्यापक पदी बढती केली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, प्रशासकीय अधिकारी सुभेदार मेजर नागराज पाटील तसेच संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड यांनी अभिनंदन केले आहे.
सत्कार नूतन मुख्याध्यापक महोदयांचा !
माळशेवगे (ता.चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनील दयाराम पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली. या पार्श्वभूमीवर विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे जेष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर, तालुका गणित मंडळाचे जी पी हडपे व “व्हॉइस ऑफ मीडिया” या पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश काटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या गायत्री भदाणे, समाधान पाटील, नीलिमा पाटील, रूपाली पाटील, पवार दादा उपस्थित होते.

