अमळनेर येथील प्राचार्यां गायत्री भदाणे यांना अनोख्या पद्धतीने निरोप  सेवानिवृत्तीला शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले गिफ्ट!
1 min read

अमळनेर येथील प्राचार्यां गायत्री भदाणे यांना अनोख्या पद्धतीने निरोप सेवानिवृत्तीला शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले गिफ्ट!

Loading

अमळनेर येथील प्राचार्यां गायत्री भदाणे यांना अनोख्या पद्धतीने निरोप

सेवानिवृत्तीला शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले गिफ्ट!

अमळनेर – एखाद्या व्यक्तीच्या कार्याची छाप ही सेवा निवृत्ती झाल्यानंतर देखील कायम असते, याची प्रत्यक्ष अनुभूती येथील शिक्षक सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना आली आहे. अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री चंद्रकांत भदाणे या सोमवारी निवृत्त झाल्या. शेवटच्या दिवशी सहकाऱ्यांनी दिलेल्या अनोख्या निरोपाने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सेवानिवृत्तीच्या दिवशी शालेय परिसरात आपल्या विद्यार्थी व शिक्षक सहकाऱ्यांकडून झालेला फुलांचा वर्षाव करीत प्राचार्याना दिलेला निरोप समारंभ हा चर्चेचा विषय ठरला आहे.
शासकीय- निमशासकीय सेवेत रुजू होणे अन वयोमानानुसार सेवा निवृत्ती होणे हे अटळ सत्य असते. शिक्षणाच्या या पवित्र प्रवाहात त्या व्यक्तीने केलेले प्रशासन, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक या गोष्टीचे नेहमीच मोजमाप होते. त्यांची कार्यक्षमता ओळखून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी गायत्री भदाणे यांची 1993 मध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती दिली. सलग 32 वर्ष प्राचार्य पदाचा अनुभव घेत त्यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या 32 वर्षाच्या सेवा काळात अनेक विद्यार्थिनी मोठमोठ्या पदांवर रुजू झाल्या आहेत. अनेक माजी विद्यार्थी संशोधक, डॉक्टर्स, इंजिनिअर, युवा उद्योजक होऊन समाजाची सेवा करीत आहे. सेवानिवृत्त च्या शेवटच्या दिवशी दिलेल्या अनोख्या निरोपने सौ भदाणे या भावुक झाल्या होत्या. त्यांनी प्राचार्याच्या खुर्चीसमोर नतमस्तक होत आपली कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेकडून विशेष सत्कार

प्राचार्या गायत्री भदाणे व वत्साई एज्युकेशन चे चेअरमन प्रा चंद्रकांत भदाणे यांचा शाळेकडून भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळशेवगे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील दयाराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून टीडीएफचे कार्याध्यक्ष उमेश काटे उपस्थित होते. यावेळी प्रतीक्षा पाटील, पल्लवी मोरे, अर्चना पाटील, प्रणव पाटील, मनस्वी भदाणे या विद्यार्थ्यांसह निवृत्त मुख्याध्यापक व्ही. सी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी. डी. पाटील, एस एस पाटील, नितीन पाटील, अनिल पाटील, गोपाल हडपे या शिक्षकांनी मनोगते व्यक्त केलीत. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उमेश काटे यांनी आपल्या मनोगतातून मॅडमांच्या प्रशासनातील कार्य कुशलतेविषयी अनुभव व्यक्त केले. त्यानंतर सत्कारमूर्ती सौ भदाणे मॅडम यांना मनोगत व्यक्त करताना गहिवरून आले. डोळ्यात आसवे दाटून आले आणि वर्षानुवर्षे ज्या शाळेची सेवा केली त्या शाळेचा निरोप घेताना त्यांची माहेरवाशिनिसारखी अवस्था झाली होती. अनेक अनुभव, आठवणी मॅडमानी सांगितल्या. त्यांनतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी आपल्या भाषणातून मॅडमांबद्दल एक स्व-रचित कविता सादर करीत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर सुनील वाघ यांनी “चलते चलते मेरे ये गीत याद रखना… कभी अलविदा ना कहना… रोते हस्ते… बस यू ही तुम गुणगुणाते रहना…. हे गीत सादर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. आर. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुनील वाघ यांनी सूत्रसंचालन केले. दिपककुमार पाटील यांनी आभार मानले. दरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सौ भदाणे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच शाळेला स्वतंत्र साउंड सिस्टीमही भेट स्वरूपात देण्यात आली.

संस्थेकडून सेवापूर्ती कार्याचा गुणगौरव

अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे या 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड यांनी भदाणे मॅडम यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गुणगौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. त्यानंतर सेवानिवृत्तीनंतरचा पुढील काळ सुख समृद्धी व निरोगी आरोग्यमय जावो यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्याम पवार, ग स पतपेढीचे माजी उपाध्यक्ष शामकांत भदाणे, वत्साई एज्युकेशन चे चेअरमन प्रा. चंद्रकांत भदाणे, निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख, निवृत्त मुख्याध्यापक गोसावी सर, रुख्मिणीताई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *