महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दखल*  *रिंगणगाव येथील तेजस महाजन हत्या प्रकरणात (SIT) एसआयटी स्थापन*
1 min read

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दखल* *रिंगणगाव येथील तेजस महाजन हत्या प्रकरणात (SIT) एसआयटी स्थापन*

Loading

*महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दखल*

*रिंगणगाव येथील तेजस महाजन हत्या प्रकरणात (SIT) एसआयटी स्थापन*

*अमळनेर प्रतिनिधी:

जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव येथील तेरा वर्षेय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणात जलद तपासासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघा चे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ कारवाई करावी असे पत्र दिले होते,महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या राज्य पातळीवरील नेत्यांची ताकद काय आहे व माळी समाजाची अधिकृत संघटना ची ताकद काय असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका रिंगणगाव येथील तेजस महाजन तेरा वर्षेय बालकाची हत्या प्रकरणात जलद तपास करण्यासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी तात्काळ सखोल चौकशी करून दखल घेण्यात यावी अशा मागणीचे पत्र थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते व तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक व मुंबई पोलीस महासंचालक व पोलीस अधिकारी तसेच मंत्रालय स्तरावरील गृह विभागातील प्रधान सचिव यांच्याशी तात्काळ संपर्क साधून सदर प्रकरणात लक्ष घालण्यासाठी यांचे लक्ष वेधले होते व महाराष्ट्र माळी समाज महासंघाने आपल्या समाजाच्या पुत्रासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता त्याची दखल राज्य सरकारने गृह खात्याने तात्काळ घेतली असून जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना तात्काळ सूचना देऊन एसआयटी स्थापन केली व जलद गतीने तपास करण्यास सांगितले तसेच फिर्यादी यांच्या सांगण्यावरुण नरबळी झाल्याचा प्रकार झाला आहे त्यात वाढीव कलम लावण्यास सांगितले हा माळी समाजाच्या एकजुटीचा विजय आहे.तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनीही आक्रमक भूमिका स्थानिक पातळीवर घेतली आहे व मागण्याचे निवेदन दिले आहे त्यामुळे सर्वांनी एकजूट राहणे महत्त्वाचे आहे असे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *