“अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!”
1 min read

“अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!”

Loading

अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
बुलढाण्यात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेमध्ये अमळनेर येथील पक्षिमित्र व उपक्रमशील शिक्षक आश्विन लीलाचंद पाटील यांना पक्षीमित्र राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या शुभ असते त्यांना सन्मानपत्र शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पहाट फाऊंडेशन आयोजित
राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषद व पुरस्कार वितरण सोहळा २८ जुन २०२५ वार शनिवार वेळ सकाळी १०.३० वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, चिखली रोड, बुलढाणा येथे संपन्न झाला.
पक्षिमित्र पाटील गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण व पक्षांचे संवर्धन व विविध व्याख्यान त्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यात आली. शाळेतही त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आजतागायत त्यांना 50 पेक्षा अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..
समारोपीय सत्र व पुरस्कार वितरण सोहळा (दुपारी ०२.३० ते ०३.३०)मा. सौ. श्वेता परदेशी- प्रमुख उपस्थिती -मा. श्री. संजय खडसे(मिसेस इंडिया विजेत्या तथा सेलिब्रिटी ज्यूरी)(उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा)मा. डॉ. अविनाश गेडाम डॉ. हरीश साखरे(प्राचार्य, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा) ((महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा)मा. केतकी गावडे (प्रसिद्ध मराठी अभिनेत्री) यांच्या शुभहस्ते पक्षिमित्र अश्विन लीलाचंद पाटील
पक्षीमित्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार वितरणाचे सूत्रसंचालन सतीश डिवरे व ऋतुजा इंगळे यांनी केले.
पक्षी मित्र अश्विन पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रतापराव पाटील व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,मित्रपरिवार,
व विविध शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *