तिसरी भाषा मानसिक दृष्ट्या न झेपणारी-प्रा.सुधाकर ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ.जिल्हाध्यक्ष, जळगाव
![]()
तिसरी भाषा मानसिक दृष्ट्या न झेपणारी-प्रा.सुधाकर ठाकूर
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ.जिल्हाध्यक्ष, जळगावजळगांव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सध्या पहिलीपासून त्रिभाषा सूत्राच्या पुरस्कार करत आहे. इयत्ता पहिली पासून तीन भाषा लहान मुलांना शिकायला लावणे बाल मानसशास्त्राच्या आणि लहान मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे . शिक्षक म्हणून माझे मत असे आहे की, इयत्ता चौथी पर्यंत सर्व विषय मातृभाषेतच शिकवायला पाहिजेत. चौथीपर्यंत शाळेची सवय होते, शारीरिक क्षमता वाढते. मातृभाषा आकलनाच्या पाया भक्कम होत असताना मध्येच दुसरी ,तिसरी भाषा आली तर त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. शिवाय मराठी ,इंग्रजी, हिंदी भाषेचे व्याकरण हे वेगवेगळे आहे. शब्द वेगळे आहेत त्याच्या परिणाम त्यांना धड मराठी येत नाही, धड इंग्रजी येत नाही आणि हिंदी तर फारच लांब. शासन म्हणते 20 विद्यार्थी असतील तेथेच हिंदी शिकवली जाईल पण 20 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक शासनाला परवडेल का? सहा वर्षांच्या मुलांवर तीन तीन भाषा व बाकीचे विषय लादणे मानसिक व शारीरिक दृष्ट्या न झेपणारे आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात राज्य पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमात कुठेही पहिलीपासून तीन भाषा शिकवा असं म्हटलेले नाही. मग महाराष्ट्रातच हा हट्ट का? दुर्दैवाने महाराष्ट्रात आज मराठी भाषेच्या शाळा कमी होत आहेत. हिंदी भाषेला विरोध नाही तर पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी शिका या सक्तीला निश्चित विरोध झाला पाहिजे असे
प्रा.सुधाकर ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ.जिल्हाध्यक्ष, जळगाव यांनी सांगितले.

