“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!” ,  माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश!
1 min read

“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!” , माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश!

Loading

“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!”

माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश!

अमळनेर (प्रतिनिधी (ईश्वर महाजन)–
ग्रामीण भागात स्थित असतानाही शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), अमळनेर या संस्थेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, दृष्टी, नियोजन आणि मार्गदर्शन ठरले तर यश अटळ असते!
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE – मुंबई) यांच्या वतीने 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल तब्बल 95% लागला असून, संस्थेच्या सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत माऊलीचा शैक्षणिक झेंडा अभिमानाने फडकवला आहे.

🔹 तृतीय वर्ष:
🥇 प्रणव कांतीलाल चौधरी – 92.24%
🥈 भूषण रवींद्र पाटील – 87.47%
🥉 मिलिंद अशोक पाटील – 82.21%

🔹 द्वितीय वर्ष:
🥇 अनुष्का विजय देवरे – 87.44%
🥈 ऋषिकेश किरण पाटील – 84.89%
🥉 चेतन पावभा धनगर – 84.44%

🔹 प्रथम वर्ष:
🥇 अथर्व प्रवीण पाटील – 85.44%
🥈 मृदुला सुरेश खैरनार – 85.41%
🥉 आर्यन विपीन सोनवणे – 83.88%

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे अथक मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाचे प्रगल्भ नियोजन आहे. शिक्षणात गुणवत्ता, संस्कार व आधुनिकतेचा संगम साधत माऊली पॉलिटेक्निकने या निकालाच्या माध्यमातून आपले शैक्षणिक बळ पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
यशस्वी निकालासाठी संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवर्गाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. संस्थेचे सचिव डॉ. संदीप जोशी व प्राचार्य श्री. कुणाल पाटील यांनीही शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
या उज्ज्वल यशामागे तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, डॉ. प्रमोद नाईक (संचालक, म.रा.तं.शि.मं.), डॉ. गोरक्ष गर्जे (सह संचालक, नाशिक विभाग) व प्रा. देवेंद्र दंडगव्हाळ (उपसचिव, छ. संभाजीनगर विभाग) यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *