“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम”
![]()
“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
संतांच्या पावन पायीवाटेवर श्रद्धा, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम साधताना कळमसरे (ता. अमळनेर) येथील ह.भ.प. व समाजभूषण मुरलीधर चौधरी व त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला चौधरी यांनी पंढरपूर पायी वारीत आपला सेवाभाव सप्रेम अर्पण केला.
श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या भव्य वारकरी दिंडीत जळगाव जिल्हा केमिस्ट्री असोसिएशनतर्फे आयोजित मोफत आरोग्य सेवा उपक्रमात चौधरी दांपत्याने मनोभावे सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आयुर्वेदीय शास्त्राच्या ज्ञानाचा सदुपयोग करत, थकवा, वेदना आणि आजारांपासून मुक्तीचा आधार दिला.
ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांना त्यांच्या वडील कै. तुळशिराम चौधरी यांच्याकडून मिळालेल्या आध्यात्मिकतेचा सुदृढ वारसा लाभलेला असून, तो त्यांच्या कार्यात प्रकर्षाने दिसून येतो. कळमसरे गावासह परिसरातील किर्तन सप्ताह, धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. केवळ प्रवचनकार नव्हे, तर ते एक कुशल आयुर्वेदाचार्यही आहेत.
या पवित्र वारीत चौधरी कुटुंबीयांनी साक्षात सेवा, श्रद्धा आणि साधनेचा संगम घडवत वारकरी भाविकांमध्ये ऊर्जा आणि समाधानाचा प्रसार केला. समाजहितासाठी स्नेहपूर्वक कार्य करणाऱ्या या सेवाभावी दांपत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()
![]()


