नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी…
![]()
नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी…
रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी…
धुळे- विकासासहित सेवा (!) देणाऱ्या धुळे महानगरपालिका आपल्या सफाई कामगारांना मात्र त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवत आहे. सदर सफाई कामगार भर पावसात जिद्दीने नाले, गटारी साफ करतांना दिसत आहेत; पण त्यांच्या हक्कांचे जे पालिकेच्या नियमात बसणारे आहेत. गम बुट, सेफ्टी गॉगल, मास्क, डगरी सुट,केमीकल ग्लोज, रेनकोट यापासून गटार सफाई व ड्रेनेज कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. काहींना वाटप झाले पण याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र त्यांचे शहरातील वरिष्ठ साहेब व्यक्तीगत विकत घेण्याची क्रय शक्ति असलेले स्वच्छता निरीक्षक ‘रेनकोट’ मध्ये दिसत आहेत. हा भेदाभेद कशासाठी? भेदाभेद अमंगल असतो. पूर्वी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून कम्युनिस्ट, काँग्रेस व समाजवाद्यांचे तिरंगी व लाल बावटे रस्त्यावर उतरत असत. आज दुर्दैवाने सर्वच बावटे इतिहास जमा झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना कसा आणि कोण न्याय मिळवून देणार? शेवटी नरकाचे जीणे त्यांच्या वाट्याला आहेच. मला कौतुक करावेसे वाटते ते साक्री रोडवरील सुरभी कॉलनीतील पालिकेचे निवृत्त शिक्षक नथ्थू हांडू शिरसाळे गुरुजी, त्यांनी घंटागाडी थांबवून कर्मचाऱ्यांना मोजे दिले. समाजाने शिरसाळे गुरुजींसारखे उदार होऊन पुढे यावे व या कर्मचाऱ्यांना दयाळु भावनेने सहकार्य करावे ही विनंती.
–

