राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे. *
1 min read

राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे. *

Loading

*राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे.
*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी ) रोजीराज्यातील 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना टप्पा अनुदान मिळावे म्हणून कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन तातडीने राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान देण्यात यावे यासाठी साकडे घातले आहे. राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना 14 ऑक्टोबर 2024 च्या जीआर नुसार टप्पा अनुदान मिळावे म्हणून आणि येणाऱ्या पावसाची अधिवेशनामध्ये त्या टप्पा वाढ अनुदानाची तरतूद करावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या जीआर नुसार राज्यातील सर्व शिक्षकांना टप्पावाढ देऊन राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती केली. सोबत माजी आमदार श्रीकांत देशपांडे माजी आमदार दत्तात्रय सावंत उपस्थित होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की सरकार यावर कामकाज करत असून त्यावर लवकरच तरतूद केली जाईल व राज्यातील शिक्षकांना अनुदान मिळेल असे आश्वासित केले.
त्यानंतर आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 05.06.2025 पासून टप्पावाढ अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षक बांधव उपोषणाला बसले आहेत त्या शिक्षक बांधवांची भेट घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या सोबत केलेल्या चर्चेची माहिती दिली, त्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *