मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी  मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग
1 min read

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग

Loading

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी

मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी : धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २३ रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. अमळनेरसह चोपडा, धरणगाव यांसह परिसरातील विविध खेड्यापाड्यातील १३५ पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदविला. पैकी १९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने त्यांना तत्काळ पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच केवळ अध्यात्मिकच नव्हे तर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते.
सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन होऊन शिबिराचा प्रारंभ झाला. आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुदेश पाटील व डॉ. राहुल चौधरी यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली. त्यांना सुजय कोल्हापुरे, परिचारिका श्रावणी गायकवाड, वैशाली राऊत, वॉर्ड बॉय भूपेंद्र वाघ यांनी सहकार्य केले. शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या १९ रुग्णांना आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे तत्काळ वाहनाद्वारे रवाना करण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, उज्ज्वला शहा, व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्यासह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश मेखा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *