मुलांनी घेतली श्यामची अनोखी मुलाखत; ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ कार्यक्रमात निसर्गाचा आणि संवादाचा संगम”
![]()
“मुलांनी घेतली श्यामची अनोखी मुलाखत; ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ कार्यक्रमात निसर्गाचा आणि संवादाचा संगम”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
साने गुरुजी कर्मभूमी स्मारकात नुकताच पार पडलेल्या ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ या कार्यक्रमाने लोकांच्या मनात विशेष छाप पाडली. सिनेमातील श्याम या व्यक्तिरेखेशी जुळवून घेतलेल्या या कार्यक्रमात मुलांनीच श्यामची मुलाखत घेतली, हा अनोखा उपक्रम असल्यामुळे विशेष पसंती मिळाली.
अद्वैत सोनवणे, शिव शिंदे, मानवी पाटील, मुक्ता महाले, मानसी सैंदाणे, दक्षता काटे, कल्याणी पाटील, गार्गी जोशी, वेदांत देवरे अशा उत्साही व हुशार मुलाखतकारांनी श्यामसोबत संवाद साधला. मुलांनी उत्कृष्ट तयारी करून या कार्यक्रमाला रंगत आणली.
पर्यावरण पूरक, निसर्गसंगम असलेल्या रम्य ठिकाणी मुलांनी खेळत-फिरत आनंद घेतला आणि स्वादिष्ट जेवणाचा लाभही घेतला. या नवीन उपक्रमाने मुलांमध्ये संवाद कला वाढवण्याचा हेतू यशस्वी ठरला.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे कार्यकर्ते व आधारस्तंभ डॉ. विकास हरताळकर, चेतन सोनार, मिलिंद भाई, प्राचार्य अरविंद सराफ, तसेच शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व शाबासकी दिली. दिपक लांब्होळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक प्रार्थनेने केली.
गोपाळ नेवे यांच्या पुण्यस्वरूप साथ मिळून, दिपक लांब्होळे, शुभम पवार, अभय वाघमोडे, प्रणव पाटील, प्रथमेश कोठावदे, शिव निकम, खुशाल पाटील, मंदाकिनी पाटील, आश्विनी वाघमोडे, गौरव महाले, संजय बारी, दर्शना पवार यांनी या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी व मेहनत घेतली.
पालकांनी विद्यार्थ्यांना असे नाविन्यपूर्ण उपक्रम आणखी घेऊन यावेत अशी इच्छा व्यक्त करत शिक्षक व आयोजकांचे मनोमन आभार केले. या उपक्रमामुळे मुलाचं व्यक्तिमत्व व संवादकौशल्य विकसित होण्यास मोठा हातभार लागला.



