धनदाई महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा*
1 min read

धनदाई महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा*

Loading

*धनदाई महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा*

अमळनेर:, प्रतिनिधी
येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धनदाई महाविद्यालयाच्या प्रांगणात शालेय सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी योग साधना केली.
यावेळी महिला पतंजलि योग पीठाच्या जिल्हा कोषाध्यक्षा योग शिक्षिका रत्ना भदाणे मॅडम , तालुका प्रभारी कामिनी पवार, मीडिया प्रभारी माधुरी पाटील , संवाद प्रभारी भारती कोळी , संघटक तथा शांतिनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाग्रतेने उत्कृष्ट रित्या योगासने करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना महत्व पटवून दिले. ज्यामुळे योगाचे महत्व आणि त्याचे शारीरिक, मानसिक फायदे उपस्थितांना स्पष्ट झाले.
याप्रसंगी धनदाई संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील यांनी सर्वांना संबोधित करत योगाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील, खजिनदार दादासो. शैलेंद्र पाटील, धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम पाटील यांनी स्वतः सहभाग नोंदवला.
यावेळी शांतिनिकेतन प्राथमिक, जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापक, शिक्षकांनी तसेच धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .
यावेळी शांतिनिकेतन प्राथमिक, जय योगेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक चे दोन्ही विद्यालयाचे सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रा.डॉ शैलेश पाटील यांनी केले. हा योग दिन कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये योगाचे महत्व रुजवण्यासाठी आणि त्यांना निरोगी व संतुलित जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *