मॉर्निंग वॉक ग्रुप धुळे रोड अमळनेरच्या सदस्यांनी उत्साहाने पार पाडला आंतरराष्ट्रीय योगा दिन!
1 min read

मॉर्निंग वॉक ग्रुप धुळे रोड अमळनेरच्या सदस्यांनी उत्साहाने पार पाडला आंतरराष्ट्रीय योगा दिन!

Loading

मॉर्निंग वॉक ग्रुप धुळे रोड अमळनेरच्या सदस्यांनी उत्साहाने पार पाडला आंतरराष्ट्रीय योगा दिन!

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

धुळे रोड अमळनेर येथील मॉर्निंग वॉक ग्रुपने आज सकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत एक अनोखा योगा सत्र आयोजित केला. ८० फुटी रोडजवळील ठिकाणी ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनशैलीस प्रोत्साहन देत एक तास योगा केले.
मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य नेहमी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असल्यासोबत सामाजिक कामांमध्येही सक्रियतेने भाग घेतात. जयंती, वाढदिवस आणि वृक्षारोपणासारखे कार्यक्रम हे ग्रुपच्या समाजसेवेतील अभिन्न भाग आहेत.
या योगा दिनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ सदस्यांचा विशेष सहभाग लाभला. जगदीश पाटील सर, देशले आप्पा, डॉ. प्रदीप पाटील, पवार आप्पा, दिलीप आप्पा, विजय पाटील, किशोर पाटील सर, ठाकरे सर आणि इतर सेवा निवृत्त नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्यासंदर्भात सशक्त संदेश दिला.
या उपक्रमातून योगा आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा प्रसार करण्याचा लोकांमध्ये सकारात्मक संदेश देण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *