कल्याण परिमंडळ ३ चा वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसाधना कार्यशाळा संपन्न .*
1 min read

कल्याण परिमंडळ ३ चा वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसाधना कार्यशाळा संपन्न .*

Loading

*कल्याण परिमंडळ ३ चा वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसाधना कार्यशाळा संपन्न .*

ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे ,ठाणे शहर यांचे आदेशान्वये, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग,कल्याण संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 3 कल्याण चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांचे उपस्थितीत खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे यांचे नेतृत्वाखाली दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 06:30 वाजता वरटॅक्स बिल्डिंग वायले नगर कल्याण पश्चिम येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर योगा कार्यक्रमाचे तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात विविध ग्रुपने सांगीतिक योग प्रकार सादर केला तर श्रीमती मीनल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्टेट योग साधना असोसिएशनच्या चिमुकल्या बाल मंडळीने संगीताच्या तालावर विविध योगाआसने सादर करून उपस्थितांची मने जिंकली . माननीय पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर वेळी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण मधील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार , तसेच ज्येष्ठ नागरिक संघ , रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी, शाळा , कॉलेजचे विद्यार्थी,शिक्षक आणि विविध सामाजिक संस्था तसेच योग ग्रुप चे सदस्य असे मोठ्या प्रमाणात नागरिक सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे वय वर्ष तीन ते वय वर्ष 92 पर्यंतच्या योग साधकांनी सदर शिबिरात सहभाग घेतला.सदर वेळी सर्व सहभागी योगा ग्रुप व सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रम आयोजित करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी यांनी विशेष सहकार्य केले . प्रोटोकॉल प्रमाणे योग शिबिराचे सूत्रसंचलन डॉ.संध्या रायतवार यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका कुमारी विद्या शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांचे नेतृत्वाखाली सर्वश्री प्रशांत अहिरे सुनील वायले, प्रीतम चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन मदन संकलेशा,पोलीस नीरिक्षक संदीप शिवले, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे पोलीस हवालदार साहेबराव पाटील , पोलिस कॉन्स्टेबल तुषार सितान यांनी विशेष परीश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *