शासन निर्णयाविरुद्ध धुळे जिल्ह्यात शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन – शिक्षक पदोन्नतीसाठी विनाअट मागणी”
![]()
शासन निर्णयाविरुद्ध धुळे जिल्ह्यात शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन – शिक्षक पदोन्नतीसाठी विनाअट मागणी”
धुळे जिल्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शासनाने शिक्षकेतर भरती बंद संबंधी दिनांक 28 मे 2025 च्या शासन निर्णय त्वरित रद्द करावा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 24 वर्षाच्या लाभ त्वरित मिळावा तसेच बक्षी समितीने शिफारस केलेल्या लाभाच्या 10 20 30 वर्षानंतरच्या आश्वासित प्रगती योजनेनुसार वेतन निश्चिती करून कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्या कर्मचाऱ्यांना विनाअट पवित्र प्रणालीची अट रद्द करून शिक्षक पदोन्नती देण्यात यावी माध्यमिक शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची पूर्वीप्रमाणे भरती करावी व केलेली बंदी त्वरित उठवावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या राज्य सर कार्यवाह शिवाजीराव खांडेकर राज्य अध्यक्ष अनिल माने राज्य कार्यअध्यक्ष वासेकर सर याच्या आदेशान्वये आज दिनांक 19 जून 2025 रोजी धुळे जिल्हा जिल्हाधिकारी यांना महाशय अप्पर जिल्हाधिकारी महेश शेलार यांना धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन शासनास भरतीचा जीआर पूर्वत सुरू करावा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले त्यावेळेस राज्य शिक्षकेतर संघटना महामंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते.

