स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार
1 min read

स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार

Loading

स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक 15 जून 2025, रविवार रोजी स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय, खेडी प्र.ज. यांच्या प्रेरणेने आणि प्रा. श्याम पवार यांच्या संकल्पनेतून इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोमेंटो, प्रमाणपत्र आणि फाईल बक्षीस म्हणून देण्यात आले. वाचनालयाच्या पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या परंपरेला यंदाही अखंडपणे चालू ठेवण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गोकुळ आनंदा पाटील, मा. केंद्रप्रमुख, प.स. विभाग, अमळनेर; श्री बी. आर. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श विद्यालय, अमळगाव; आणि श्री हरिश्चंद्र शिवराम कढरे, मा. ग्रेडेड मुख्याध्यापक, अमळनेर उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. श्याम साहेबराव पवार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री टी. पी. पाटील यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. श्री गोकुळ आनंदा पाटील यांचा सत्कार चंद्रकांत साहेबराव पाटील यांनी केला, श्री बी. आर. पाटील यांचा सत्कार नागराज भालेराव पाटील यांनी तर श्री हरिश्चंद्र कढरे यांचा सत्कार नरेंद्र मोतीलाल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. श्याम पवार यांचा सत्कार सुनील दिनकरराव पाटील यांनी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष टी. पी. पाटील यांचा सत्कार सरोवर भिलन पिंजारी यांनी केला.
या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत गावातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त, वाचनालयाने 2025 पासून सुरू केलेल्या “बेस्ट वाचक पुरस्कार” चा सन्मान प्रथम बेस्ट वाचक श्री सुरेश पितांबर पाटील यांना देण्यात आला. गावातून नुकताच बी फॉर्म पूर्ण केलेले वैभव अशोक शिंदे व हितेश राजेंद्र पाटील यांचाही सत्कार झाला. अमळनेर येथील बीएसडब्ल्यू कॉलेजमधून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण सारंग कैलास पाटील यांनाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या मनोगतामध्ये प्रमुख पाहुणे श्री गोकुळ आनंदा पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्मरणीय सल्ला दिला. ते म्हणाले की, “90 पेक्षा जास्त मार्क मिळाल्याबाबत हुरडून जाऊ नका आणि 90 पेक्षा कमी मार्क मिळाल्याने घाबरू नका. हा काळ तुमच्या घडणारा आहे. सातत्य, मेहनत, चिकाटी आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. वय 16 ते 19 वर्ष हा काळ तुमच्या मोठे होण्याचा असतो. अभ्यासासाठी योग्य पद्धत आणि मार्गदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षा ही संपूर्ण वर्षात तयार होऊन दिलेली असते, त्यामुळे हंगामी न करता नियमित अभ्यास करा.” त्यांनी स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी गोष्टसुद्धा सांगितली आणि विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या मेहनतीचा आणि गावाच्या नावाच्या उज्वलतेचा सतत आदर ठेवण्याचा संदेश दिला.
श्री डी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांना कधीही विसरू नयेत असे मार्गदर्शन केले तर श्री हरिश्चंद्र कढरे यांनी वेळेचे नियोजन, चारित्र्य आणि आत्मनियमन या विषयांवर शिकवण दिली.
वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. श्याम साहेबराव पवार यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ताबद्ध परंपरा कायम ठेवण्याचा सल्ला दिला आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री टी. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या समारंभाला गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थित लोकांमध्ये राजेंद्र पाटील, नागराज पाटील, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, नरेंद्र पाटील, निंबा पाटील, नितीन पाटील, कैलास पाटील, सरोवर पिंजारी, सुरेश पाटील, किसन पाटील, विजय पाटील, सुनील पवार हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जिजाबराव पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला राजमुद्रा अभ्यासिकेतील सदस्यांचे सहकार्य लाभले.
स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालयाच्या या वार्षिक परंपरागत सत्कार समारंभाने गावातील युवकांना उच्च शैक्षणिक आणि चारित्रिक मार्गदर्शन मिळवून दिले असून, पुढील काळातही अशाच कार्यक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचे संकल्प व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *