व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड यांच्यावतीने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे अभिनंदन!!
![]()
व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड यांच्यावतीने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे अभिनंदन!!
अमळनेर प्रतिनिधी
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांना 2025 सालचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला. देशातील 17 प्रमुख खासदारांमध्ये निवड झालेल्या आणि समग्र कामगिरीसाठी हा मानाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्रीमती स्मिता वाघ देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्याबद्दल व्ही .झेड.पाटील हायस्कूल शालेय समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.श्रीमती. पुष्पलता अशोक पाटील (अध्यक्षा शालेय समिती शिरूड),सौ. तीलोत्तमा पाटील (मा.पणन संचालिका), श्री.शाम अहिरे (सभापती प.स. अमळनेर), शालेय समिती सदस्य काळू नाना पाटील , वसंत भगवान पाटील पुंजू एकोबा पाटील, डी.ए. धनगर सर , अरविंद रंगराव पाटील सर, बापूराव भिवसन महाजन (चेअरमन वि.का.सो) गोविंद मच्छिंद्र सोनवणे (सरपंच) ,अनिल सूर्यवंशी (मुख्याध्यापक) ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या. जळगाव जिल्ह्याचा अभिमान खासदार श्रीमती वाघ यांच्या या यशामुळे शिरूड गावातील सर्वसामान्यांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

