अमळनेर तालुक्यात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक! आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखणार
![]()
अमळनेर तालुक्यात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य कार्यकर्ता बैठक! आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखणार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी बैठक दिनांक 14 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता शिव पेट्रोलियम, हशमजी प्रेमजी संकुल शेजारी, कचेरी रोडवर आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आदरणीय मा. आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
बैठकीस उमेश दादा पाटील आणि प्रा. अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बापूसाहेब प्रमोद पाटील यांनी निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा विषय, तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका याबाबत सखोल विचारविनिमय करण्यात येणार आहे. याशिवाय आत्ताच्या वेळेतील इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होणार आहे.
तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील आणि शहर अध्यक्ष प्रशांत निकम यांनी सर्व कार्यकर्त्यांना या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी राजकारणासाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची अपेक्षा आहे.

