नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित
![]()
नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण.
आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित
जळगांव प्रतिनिधी- नोबेल फाउंडेशन अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जागृतीसाठी कार्य करीत आहे या कार्याला फळ यायला सुरुवात झालेली आहे.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) यांच्याद्वारे संचालित युविका (युवा विज्ञानी कार्यक्रम) प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांमध्ये विज्ञान विषयी रुची निर्माण व्हावी याकरिता नि:शुल्क पंधरा दिवस प्रशिक्षण देण्यात येते. आठव्या वर्गातील गुण, विविध खेळांमधील सहभाग, विज्ञान प्रदर्शनी मधील सहभाग, ओलंपियाड क्रमांक, एनसीसी मध्ये सहभाग या निकषावर निवड आधारित असते. याकरिता संपूर्ण भारतातून ३५० मुलांची निवड करण्यात येते. २०२४-२०२५ मध्ये महाराष्ट्रातून १२ मुलांची निवड करण्यात आली. युविका प्रकल्पातील या प्रशिक्षणासाठी नोबेल फाउंडेशनचा विद्यार्थी यथार्थ कौस्तुभ जनईकर ची निवड झाली होती . नुकतेच स्पेस अप्लिकेशन्स् सेंटर (SAC) अहमदाबाद, गुजरात येथे नि:शुल्क प्रशिक्षण संपन्न झाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उपग्रहांची बांधणी उपग्रह कार्यप्रणाली रॉकेट कार्यप्रणाली रॉकेट उड्डाण प्रणाली रॉकेटचे इंधन तसेच उपग्रहांच्या कक्षांबाबत तसेच अंतराळ विज्ञानाबाबत यथार्थला प्रशिक्षण देण्यात आले. नोबेल फाउंडेशन आणि भरलेल्या कांताबाई जैन फाउंडेशन यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च या राज्यस्तरीय परीक्षेत यथार्थ राज्यात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला होता.यथार्थच्या या यशामुळे त्याची इस्रो दौऱ्यासाठी देखील निवड झालेली होती.
यथार्थच्या या यशाबद्दल यथार्थाच्या आयआयटी गांधीनगर येथील सेंटर फॉर लर्निंग येथे प्रा.तापस हिरा तसेच नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांच्या उपस्थितीत सन्मान पदक आणि सन्मानपत्र देऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना जयदीप पाटील म्हणाले की, यथार्थच इस्रो येथील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. यथार्थ सारख्या विद्यार्थ्यांची देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राला नितांत गरज आहे. हेच विद्यार्थी भविष्यात अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवतील.
फोटो कॅप्शन – यथार्थ जनईकर व पालकांचा आयआयटी गांधीनगर येथे सन्मान करताना प्रा. तापस हिरा व नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील

