नवलभाऊ ‘आयटीआय’ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी व्याख्यान
1 min read

नवलभाऊ ‘आयटीआय’ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी व्याख्यान

Loading

नवलभाऊ ‘आयटीआय’ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील नवल भाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. उषा पाटील यांचे ‘कुटुंब प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अपर सचिव मनिषा वर्मा, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. श्याम पवार हे अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीचे माजी संचालक संभाजी पाटील, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख, आर्मी स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे, प्राचार्य किरण बाविस्कर, गिरीश पाटील, मन्साराम शिसोदे, व्ही डी पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. एस जे शेख यांनी ‘हक्क आणि कर्तव्य’ या विषयावर तर प्रा. श्याम पवार यांनी ‘पर्यावरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी श्याम पाटील, संजय पाटील, बाळू सोनवणे, विकास पाटील, जयेश वाडीले, किरण पाटील, योगेश नेरकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. के. बी. बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. लिपिक अनिल काटे, निदेशक दुर्गेश वैद्य, विजय पाटील, प्रवीण पाटील, भारती पाटील आदींनी सहकार्य केले.
—–
अमळनेर – शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान देताना प्रा. उषा पाटील. समोर उपस्थित मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *