विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ  पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर
1 min read

विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर

Loading

विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ

पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर

अमळनेर प्रतिनिधी

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपारिक भारतीय तथा हिंदू विवाह संस्कृतीला आड फाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानूकरण करणारे ,अत्यंत विभत्स व अनुचित गैरप्रकार सर्वत्र सुरू झाले आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठीच मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून खास येत्या मंगळवारी ( दि.१० जून) सकाळी ११ वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर येथे उपस्थितांना अनुचित गैरप्रकार थांबवण्यासाठीची सामूहिक शपथ दिली जाणार आहे .त्यानंतर मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना कायमस्वरूपी ही शपथ देण्याचा उपक्रम सुरू मंदिराचे व्यवस्थापन पाहणारी मंगळ ग्रह सेवा संस्था सुरू करीत आहे.
अशा प्रकारचे पुरोगामी तथा क्रांतिकारी पाऊल उचलणारे श्री मंगळ ग्रह मंदिर हे देशातील पहिलेच मंदिर ठरणार आहे यापूर्वीही वस्त्र संहितेचा एल्गार याच श्री मंगळ ग्रह मंदिराने सर्वप्रथम पुकारला होता हे विशेष…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *