नाभिक समाजामुळे मानवजातीचे सौंदर्य टिकून -मनिलाल शिंपी.  शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक गुणगौरव समारंभ संपन्न.
1 min read

नाभिक समाजामुळे मानवजातीचे सौंदर्य टिकून -मनिलाल शिंपी. शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक गुणगौरव समारंभ संपन्न.

Loading

 

नाभिक समाजामुळे मानवजातीचे सौंदर्य टिकून – मनिलाल शिंपी.

शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न.
शहादा:( स्व.रा.तो)
शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.श्री संत सेना भवन शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साह पुर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हुशार,होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर,वह्या,कंपास पेटी ई. शैक्षणिक साहित्य देण्यात आले तसेच इ.10वी व 12वी कला,विज्ञान,वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले तसेच मातृछत्र व पितृछत्र हरपलेल्या मुला-मुलींना श्री संत सेना शिष्यवृत्ती चे वितरण करण्यात आले.
समाजाचे अध्यक्ष उद्धवजी जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली, परिवर्धे येथील दानशूर सुपुत्र, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी,तसेच कृ.उ.बा.स. शहादा चे सभापती श्री.अभिजीत पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याचे सरकारी अभियोक्ता अँड.विनोद गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले .यावेळी अखिल भारतीय गुजर महासभेचे महामंत्री श्री. सुनील पाटील, स्थायी समिती म.न.पा ठाणे. चे माजी सभापती भैयासाहेब इंदिसे, समाजसेवक भबुताभाई झिपरूभाई सोनवणे, समाजसेवक सुभाषभाई छगनभाई सोलंकी, योगेश कांतीलाल चौधरी रा. तळोदे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शहादा चे वरिष्ठ लिपीक घनश्याम बागल, संदीप रघुवंशी प्रो. आनंद बुक डेपो नंदुरबार, श्री संत सेना कारागिरांची पथसंस्थेचे चेअरमन मा.श्री संजय जांभळे,साईबाबा पथसंस्थेचे मॅनेजर मा.श्री ज्ञानेश्वर जाधव.हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्य,श्री संत सेना शिष्यवृत्ती,बक्षीस वितरण करण्यात आले.त्याच प्रमाणे समाजातील मातृ छत्र-पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांमधून एका भाग्यविजेती मुलीस व मुलांन मधून एका भाग्यविजेता मुलास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ मनिलाल शिंपी यांच्या शुभहस्ते सायकल वितरण करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील,इ.10वीत घवघवीत यश संपादन करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनींना तसेच इ.12वी विज्ञान ,वाणिज्य, कला इ.12वी शाखेत या बक्षीस पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनिंना मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिसाची रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.यावेळी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांनी आपल्या वारकरी संप्रदाय शैलीत संत सेना महाराज यांच्या भगवंत भक्तीचा दृढ विश्वास आणि विठ्ठलनामाचे वेड याबाबत उदाहरण देत सांगितले की आपल्या सेना महाराजांची भक्ती खंडित होऊ नये यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने बादशहाची हजामत केली.शिंपी आणि न्हावी जर नसते तर आज सृष्टीमध्ये आपले प्रतिबिंब कसे दिसले असते, म्हणून मानव समाजाला शिंपी समाज आणि नाभिक समाजामुळे सौंदर्याची परंपरेची पताका लाभली आहे.शिंपी समाज जोडण्याचे काम करतो तर नाभिक समाजामुळे सौंदर्य टिकून राहते. म्हणून आपल्या समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेणे अनिवार्य आहे.असे शिंपी यांनी सांगितले.तसेच प्रमुख पाहुणे ॲड.विनोद गोसावी,अभिजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण समितीच्या सुत्य उपक्रमाचा लाभ घ्यावा.आधुनिक जगात आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण घेणे गरजेचे असून, आपले स्वप्न पूर्ण करण्या साठी मोबाईल व टीव्ही पासून लांब राहा मोठे होण्यासाठी मोठी स्वप्ने बघा शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. उद्धवजी जांभळे यांनी शिक्षण समितीच्या कार्या मुळे आज समाजाने शैक्षणिक प्रगतीचे शिखर गाठले आहे, यास्तव शिक्षणासारख्या पवित्र कार्यास आपण सर्वांनी मदतीच्या हाथ पुढे करावा असे आवाहन करून शब्दांना विराम दिला. या कार्यक्रमात शिक्षण समितीचे मार्गदर्शक,समाजाचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य विभागीय अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य ,विविध संस्था व पतसंस्था मंडळाचे पद्धाधिकारी व संचालक तरुण कार्यकर्ते पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.सुभाष सोनवणे यांनी केले तर शिक्षण समितीचे सचिव अशोक जाधव व संचालिका सौ.उज्ज्वला जांभळे यांनी सुरेख सूत्र संचालन केले शेवटी शिक्षण समितीचे सचिव अशोक जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.श्रीअशोक जाधव यांच्या कडून विद्यार्थी विद्यार्थांना अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीचे उपाध्यक्ष अजितेम सोनवणे , उपाध्यक्षा सौ.सुचिता पवार. कोशाध्यक्ष हरीश सोळंकी , सहसचिव श्री.रमण सोनवणे आणि सर्व सन्मामनीय संचालक बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून सायकल देण्यात आली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *