छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन  भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती ,  लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद
1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन

भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती ,

लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक 06 जून 2025 रोजी माध्यमिक विद्यालय भरवस, तालुका अमळनेर येथे महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत भव्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीराचं उद्घाटन माननीय आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या भेटीचे प्रमुख आकर्षण म्हणजे माननीय ताईसो जयश्री अनिल पाटील यांनी या मोफत शिबीराच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजावून घेऊन मार्गदर्शन केले.
शिबीरात उपविभागीय अधिकारी श्री नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार श्री रुपेशकुमार सुराणा, उप अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती स्मिता गावितसह तालुका नंर्फ कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी यंत्रणेने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे भरवस, लोणपंचम, मुडी प्रकल्प, बोदडे, चौबारी, भोरटेक, धानोरे, जैतपीर, सबगव्हाण, पाडसे, वासरे, खर्दे, खेडी बु. प्रकल्प, बाम्हणे, एकलहरे, भिलाली आणि कळंबे अशा गावांतील सुमारे 700 ते 800 नागरिकांनी सहभाग घेतला.
शिबीरात पुरवठा शाखेने 38 नवीन व दुबार शिधापत्रिका दिल्या तर संगायो शाखेने 243 डीबीटी प्रक्रिया पूर्ण केल्या आणि 17 नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले. निवडणुक शाखेने नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6 आणि स्थलांतरित मतदारासाठी नमुना 8 भरून घेण्यात आला. सेतु शाखेने उत्पन्न दाखले, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी व जातीचे दाखले वाटप करत अनेक नागरिकांचे लाभ सुनिश्चित केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत जलतारा प्रशासकीय मान्यता, गोठा शेड व तुकडा नोंद कमी करणे अशा विविध शासकीय कागदपत्रांचा पुरवठा झाला. तसेच जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गतही सुधारित नोंदी नागरिकांना वितरण करण्यात आल्या. याशिवाय ९ नागरीकांना आधार उद्योम प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शिबीरातील सर्व विभागांनी आपापल्या स्टॉलद्वारे शासकीय सेवा तत्परतेने दिल्या तर लाभार्थींनीही समाधान व्यक्त केले. तहसिलदार श्री रुपेशकुमार सुराणांनी शिबीराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करत यासाठी आयोजकांचे व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
हे शिबीर गतिमान प्रशासन व आपत्तकालीन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी एक मोठा टप्पा ठरले असून, भविष्यातही अशा उपक्रमांना वेग वाढावा, यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *