वृक्षारोपणामुळे जैवविविधतेचे जतन होऊ शकते.-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
![]()
वृक्षारोपणामुळे जैवविविधतेचे जतन होऊ शकते….. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
शिरूर,कोरेगाव भीमा: मानवी गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक स्तोत्राचा बेसुमार ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून पाऊस, तापमान तसेच सजीव सृष्टी, जैवविविधता यावर परिणाम झालेला आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात अलीकडे काँक्रीटचे जंगल निर्माण होत आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड होत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य लवकर येण्यासाठी कृत्रिम औषधांचा वापर होत आहे. त्यामुळे सजीव सृष्टी मध्ये मोठमोठे आजार उद्भवत आहेत. यासाठी वृक्ष लागवड व सेंद्रिय खतांचा वापर, गांडूळ खत प्रकल्प हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. जैवविविधता जतन करण्यासाठी वृक्ष लागवड अत्यंत महत्त्वाची आहे. वृक्ष लागवडीमुळे जैव विविधतेचे जतन होऊ शकते असे मत जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरुळी कांचनयांनी येथे व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड व गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. आपले मत पुढे व्यक्त करताना ते म्हणाले की गेली 35 ते 40 वर्षापासून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन सिंगापूर पुरंदर येथे माजी केंद्रीय मंत्री व वनराईचे अध्यक्ष स्व मोहन धारियाजी यांनी माझा खास सन्मान केला होता. जीवनामध्ये अनेक ऋण आपल्याला फेडावे लागतात. त्यासाठी जोपर्यंत या पृथ्वीवर आपण आहोत तोपर्यंत वृक्ष लागवड करून पृथ्वीच्या ऋणातून मुक्त व्हावे असे मत व्यक्त केले. तसेच डॉ. चंद्रकांत गव्हाणे यांनी गांडूळ खत प्रकल्प हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे, त्याचा उपयोग परिसरातील तसेच जिल्ह्यातील राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शास्त्रज्ञ प्रो.डॉ.चंद्रकांत गव्हाणे यांच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग होण्यासाठी शासनाने त्यांना एखाद्या कमिटीवर घ्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर हरगुडे अशोक आबाजी अध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा, विनायक एकनाथ हरगुडे उद्योजक सणसवाडी, रावसाहेब फडतरे अध्यक्ष अखंड हरिनाम सप्ताह कोरेगाव भीमा, पि.के. अण्णा गव्हाणे माजी सदस्य पंचायत समिती शिरूर, बबन बाळासाहेब गव्हाणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, मुकुंदा गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते कोरेगाव भीमा, सुशील वाघमारे सामाजिक कार्यकर्ते वाघोली, डॉ.सुभाष कट्यारमल संस्थापक अध्यक्ष श्रीराम शिक्षण संस्था कोरेगाव भीमा, इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई मानव ट्रस्ट उरुळी कांचन, शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत गव्हाणे, कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप शेठ कचरू ढेरंगे, यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व व गांडूळ खत प्रकल्प याबद्दल माहिती विशद केली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने डॉ. मणी भाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.

