“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाची प्रत्यक्ष जपणूक; रा.बा. पाटील यांचे भावनिक सेवानिवृत्ती कार्यक्रम
![]()
“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाची प्रत्यक्ष जपणूक; रा.बा. पाटील यांचे भावनिक सेवानिवृत्ती कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ” या उक्ती ची प्रत्येक्ष अनुभूती चोपडा येथील येथील रुख्मिणीबाई प्रतिष्ठान मुंबई संचलित रुख्मिणीबाई माध्यमिक विद्यालय वेले आखतवाडे येथील शाळेत व लगत असेल्याला “मानव सेवा तीर्थ ” या परिसरात बेवारस मनोरुग्णाना दिलेल्या भोजन सेवेतून पाहण्यात आली व त्या प्रसंगी आम्ही उपस्थिती लाउन न भूतो न भविषते असा मोहक व डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणारा अनुभव घेतला या पुण्याचे प्रत्येक्ष दाते होते मुख्याध्यापक आबा साहेब.श्री राजेंद्र बाजीराव पाटील. एक सोजवळ व्यक्तिमत्व.उत्तम प्रशासन,मनापासून समोरच्याला आपले से करून त्यांच्या पासून चांगले काम करून घेणारे,निष्काम भाव, हजरजबाबी, अभ्यासू व्यक्तिमत्व, काम, क्रोध, मोह व मत्सर यांना जवळ न येउ देनारे अजात शत्रू म्हणून परिचित असणारे.आबा, आपणावर मागील काळात मोठे आरोग्याचे संकट ओढवले आपण आपल्या चांगल्या केलेल्या कर्माने मुळे त्यावर हिंमतीने मात केली…धन्य आबा साहेब यांचे माता पिता व त्यांची अर्धांगिनी व परिवार यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात त्यांची ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा. ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा विद्यालयातआयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुनील गरुड मानद शिक्षण संचालक नवलभाऊ प्रतिष्ठान नवलनगर हे होते.प्रमुख अतिथी सुनील कौतिक पाटील संचालक संजय एज्युकेशन प्रा श्याम पवार प्रशासकीय अधिकारी नवलभाऊ प्रतिष्ठान, धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय पवन देसले, सेवानिवृत्त पीएसआय गंभीर पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर नीलम पाटील, अमळनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्राध्यापक अशोक पवार, धरणगाव तालुक्याचे शिवसेना अध्यक्ष डी ओ पाटील जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजय सोनवणे, मानव सेवा तीर्थ ते व्यवस्थापक एन आर पाटील, अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका सुषमा वासुदेव देसले, येथील सरपंच प्रतिभा पाटील उपसरपंच आरती परदेशी, डॉक्टर अनिल पाटील,तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, शहापूर हायस्कूल मुख्याध्यापक आर डी पाटील, रणाईचे हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास पाटील, निंब हायस्कूल चे मुख्याध्यापक ए .बी चौधरी चौबारी मुख्याध्यापक बापू व्यास. सुरेश पाटील सर. चौधरी साहेब चोपडा. विलास शिंदे खेडी कैलास पाटील कामतवाडी. शुक्ला सर, सुशील भाऊ, विशाल पाटील. प्रशांत गावंडे पंकज पाटील आदी मान्यवर मंच स्थानी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून सेवानिवृत्ती निमित्त येथील मानव सेवा तीर्थ येथील मनोरुग्ण(प्रभू) यांना निष्ठांना भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संजय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील रुक्मिणीबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ शीलाताई पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राध्यापक डॉक्टर नीलम पाटील प्राध्यापक सुनील गरुड प्राध्यापक अशोक पवार व बहुसंख्य शिक्षकांनी व मान्यवर मंडळीनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर बी पाटील यांच्या सेवाकाळातील भूमिकेवर प्रकाश टाकताना कृतज्ञता भाव व्यक्त करुन गौरव केला. याप्रसंगी रमेश खंडेराव पाटील सुरेश विष्णू पाटील अशोक पाटील मधुकर पंडित पाटील प्रवीण बाविस्कर सविता पाटील वाल्मीक पाटील पांडुरंग पाटील सतीश पाटील तलाठी हिंगे आर एस साळुंखे विलास साठे राहुल गुरव दिलीप सोनवणे राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक एस पी शंखपाळ यांनी केले तर सूत्रसंचालन सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुनीर तडवी जीएम मोरे अनिल पाटील प्रदीप पाटील शांताराम सावकारे ज्योती धनगर दिपाली पाटील आदींनी परिश्रम घेतले. शब्द मर्यादा असल्याने येथे थांबतो..शेवट निरोप देताना आबा साहेबांनी प्रथम आरोग्य, कुटुंब व नंतर सारे या कडे लक्ष द्यावे.. आबा आपण्यास पुढील सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा…

