भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणजे गोविंद देवरे: डॉ. मिलिंद बागुल.
1 min read

भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणजे गोविंद देवरे: डॉ. मिलिंद बागुल.

Loading

भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणजे गोविंद देवरे: डॉ. मिलिंद बागुल.

जळगाव–(प्रतिनिधी) भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणून गोविंद देवरे यांनी जीवनपणाला लावले, कवितेचे वेड लावणारा माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाईल आता त्यांनी उर्वरित आयुष्य जगताना कवितेसाठी जगावं असं प्रतिपादन साहित्यिक कवी डॉ. मिलिंद बागुल यांनी येथे केले.
जळगाव शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात साहित्य विकास मंडळाच्यावतीने आयोजित अमृत महोत्सवी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या नेतृत्वाचा यथोचित गौरव केला. या कार्यक्रमाचे आयोजक कवि तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश जे पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य विकास मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कवी निंबा बडगुजर, यांनी आपला पोवाडा संग्रह भेट दिला. ज्येष्ठ कवी डी.बी. महाजन, पितांबर भारुडे, भास्करराव चव्हाण, कवयित्री शितल पाटील, पुष्पा साळवे, मंदा मोरे पत्रकार शरद भालेराव आदींनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला कवी जयसिंग वाघ, आर.डी. कोळी, विनोद ढगे, विलास सोनवणे, रमेश बनकर, गोविंदराव पाटील, माधव खरात किशोर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंद देवरे यांचा सर्व साहित्यिकांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी ज्ञानेश्वर पाटील, वाणी, व इतर साहित्यिकांनी देवरे यांना पुस्तक भेट म्हणून दिले. गोविंदराव देवरे आदर्श जीवन जगले, चळवळीतून त्यांनी संसाराचा गाळा चालवला, त्यांच्या परिवाराने त्यांना आता पुढील वाटचालीसाठी चांगल्या प्रकारे वागून घ्यावे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. चेतन देवरे, विलास सोनवणे, रमेश पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले आभार पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *