चर्मकार विकास संघाची जिल्हा,तालुका कार्यकारिणी निवड,सहविचार सभा शनिवारी
![]()
चर्मकार विकास संघाची जिल्हा,तालुका कार्यकारिणी निवड,सहविचार सभा शनिवारी
दिनांक 7 जून रोजी सकाळी 10 वाजता**
जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा,तालुका स्तरीय पदाधिकारी, समाजसेवक व सामाजिक बांधिलकी निभावण्यास इच्छुक असलेल्या समाज बंधू भगिनींना कळविण्यात येते की,जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिणी गठित करण्यासाठी **जळगाव
जिल्ह्यातील चर्मकार बंधू भगिनींची सहविचार सभा शनिवार दिनांक 7 जून 2025
रोजी सकाळी 10 वाजता अँड.श्री.अर्जुन भारुळे यांचे कार्यालय, जुना खेडी रोड,समर्थ बैठक हॉल समोरील रस्ता,हॉटेल कावेरी समोर,जळगाव**या ठिकाणी आयोजित केली आहे.या प्रसंगी
चर्मकार समाजाच्या विकास, न्याय, हक्क आणि सन्मानाच्या व विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध तालुका पदाधिकारी,सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या समाज बंधू भगिनींची संघटनेच्या पदाधिकारी पदी नियुक्ती करण्यात येणार आहे तरी आपण सामाजिक बांधिलकीतुन आपला वेळ चर्मकार समाजाच्या हिताकरिता व प्रश्नांकरिता देऊन सहविचार सभेस वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
**विनीत-जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघ,जळगाव**🙏🙏🙏🙏🙏

