अरविंद सोनटक्के यांचा मराठी लाईव्ह न्युजने सेवापुर्ती निमित्ताने केला सन्मान
![]()
अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्ती दिनानिमित्ताने नुकताच मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने सन्मानपत्र शाल देऊन सत्कार करण्यात आला..
अरविंद सोनटक्के सर – हे नाव उच्चारलं की समोर येतो एक शिस्तबद्ध शिक्षक, एक प्रेमळ मार्गदर्शक, एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि गरज पडली तर मदतीला धावून येणारा खरा सहकारी.गेल्या 8 वर्षांपासून, महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव ता. अमळनेर या ठिकाणी मराठी विषयाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या मनात शब्दांची, संस्कारांची आणि मूल्यांची बीजं रोवली.
मराठी फक्त विषय नव्हता त्यांच्यासाठी – ती होती एक भावना, एक संस्कृती. त्यांच्या शिकवणीत शब्दांबरोबर सौंदर्य, व्याकरणाबरोबर विचार, आणि साहित्याबरोबर जीवनाचे धडे मिळत असत. अशा या शिक्षकाचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील,शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.. सत्काराला उत्तर देताना अरविंद सोनटक्के म्हणाले की मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने केलेला सत्कार हा नेहमी हृदयात राहील. शिक्षक व पत्रकाराचा सन्मान करण्यासाठी मोठे मन लागते ते पत्रकार मित्र ईश्वर महाजन यांच्याकडे आहे पत्रकाराने पत्रकाराचा सन्मान करणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे असेही त्यांनी सांगितले.

