विज्ञान शिक्षक डी के पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार
![]()
विज्ञान शिक्षक डी के पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
उपक्रम शिक्षक डी. के. पाटील सर,
पूज्य साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक, अमळनेर विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र, यांना त्यांच्या सेवापूर्ती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व सत्कार
मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष व मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर व जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभुदास पाटील,शिक्षक व पत्रकार ईश्वर महाजन यांनी त्यांचा सत्कार केला.
डि.के.पाटील सर विज्ञान विषयातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला जागृत करणाऱ्या आपल्या अविरत मेहनतीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आपल्या मितभाषी व्यक्तिमत्त्वातून शाश्वत ज्ञान व संस्कारांचे बीजारोपण आपण केले आहे. त्यांच्या पत्नी या शिक्षिका असून त्यांची दोन्ही मुले विद्या विभूषित आहेत.. सर हे वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते.
त्यांनी आपल्या उज्ज्वल मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही नवनवीन गोष्टी शिकण्यास व संशोधनात रुची घेण्यास प्रेरित होत आहेत. पुढील आयुष्यातही आपल्या तज्ज्ञतेने, स्नेहाने आणि समर्पणाने नव्या पिढीला प्रगल्भतेचा आणि विज्ञानाच्या वाटेवर सतत चालण्यासाठी मार्गदर्शन करत राहावे, ही सदिच्छा. व्यक्त करण्यात आली.

