NDA -SPI परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे दणदणीत यश* दोन विद्यार्थ्यांची NDA-SPI साठी निवड.
![]()
*NDA -SPI परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे दणदणीत यश*
दोन विद्यार्थ्यांची NDA-SPI साठी निवड.
अमळनेर प्रतिनिधी
नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या सर्विसेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर म्हणजेच एसपीआय या इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेत नोबेल फाउंडेशनच्या आर्यन सुरसे आणि प्रथमेश पगार या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून त्यांची निवड दोन वर्षाच्या एनडीए एसपीआय प्रशिक्षणासाठी झालेली आहे.
आर्यन सुदर्शन सुरसे हा नांदगाव तालुक्यातील साकोरे गावाचा असून वडील शिक्षक आहेत तर प्रथमेश दीपक पगार हा नाशिक येथील आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची नोबेल फाऊंडेशनच्या नोबेल सायन्स टैलेंट सर्च परीक्षेत देखील यश संपादन केले असून त्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थी नोबेल फाउंडेशनच्या दुरस्थ शिक्षण बॅचेसचे विद्यार्थी आहेत. या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील म्हणाले की, “एनडीए सारखे करिअर आपल्या विद्यार्थ्यांना देशसेवेची संधी देते .ग्रामीण भागात संरक्षण तसेच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील जागरूकता निर्माण करणे नोबेल फाउंडेशन चे कार्य आहे .या कार्याला आता फळ यायला लागले आहे . आर्यन आणि प्रथमेश चे यश ग्रामीण विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी असेल”.यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

