बोरमली घटने संदर्भात पुरोगामी संघटना तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
![]()
बोरमली घटने संदर्भात पुरोगामी संघटना तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बोरवली तालुका चोपडा येथील आदिवासी महिलेला शासनाच्या असणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे रस्त्यात बाळंतपणाची वेळ यावी तसेच आदिवासी भागात आरोग्य सेवेच्या संदर्भात अधिकारी कर्मचारी यांची असणारी अनास्था यामुळेच अशा परिस्थितीला आदिवासी, वंचित, उपेक्षित अशा महिला, नागरिकांना सामोरे जावे लागते घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील सर्व पुरोगामी विचारधारेच्या संघटनांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सदर महिलेच्या व नवजात बाळाच्या होणाऱ्या त्रासाची जबाबदारी निश्चित करून तिला व तिच्या कुटुंबाला योग्य ती भरपाई देण्यात यावी, संबंधित डॉक्टर आरोग्य कर्मचारी व प्रशासनिक अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नर्स इत्यादी आवश्यक पदे तातडीने भरावी, आदिवासी भागामध्ये जनजागृती व आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात अशा प्रकारच्या निवेदनात मागण्या करण्यात आल्या असून निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी मुकुंद सपकाळे , डॉ.करीम सालार,सुरेंद्र पाटील, राम पवार, सचिन धांडे, वाल्मीक जाधव, डॉ. मिलिंद बागुल, एडवोकेट राजेश गोयर, विजयकुमार मौर्य, महेंद्र केदार, शिवराम शिरसाट, विनायक साळुंखे, मधुकर पाटील, विश्वास बिऱ्हाडे, पितांबर अहिरे, गोपाळ भालेराव, सोमा भालेराव, दिलीप सपकाळे , विलास सुरवाडे, कलिंदर तडवी, प्रा.प्रीतीलाल पवार,योगेश बाविस्कर,काशिनाथ चव्हाण,सुभाष साळुंखे,संजय बागुल,जयपाल धुरंधर व अनेक मान्यवर निवेदन देण्याप्रसंगी उपस्थित होते.

