सोनगीरमध्ये श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत विशेष सत्कार समारंभ**
1 min read

सोनगीरमध्ये श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत विशेष सत्कार समारंभ**

Loading

**सोनगीरमध्ये श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत विशेष सत्कार समारंभ**

सोनगिर प्रतिनिधी
सोनगीर येथे आज श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाची मासिक मीटिंग भरपूर उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात नुकतेच शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या श्री कैलास फौलाद पाटील यांचा तसेच सोनगीर ग्रामपंचायतीचे प्रभावी सरपंच आणि १०वी उत्तीर्ण झालेल्या श्री लखन ठेलारी यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळवणाऱ्या प्रा. सागर राजेंद्र पटेल व समाजसेवक अनिल दादा पाटील यांचा देखील गौरव करण्यात आला.

श्री एम टी गुजर यांच्या अध्यक्षतेखाली  हा कार्यक्रम संपन्न झाला. उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात येथील श्री मोरेदादांनी धार्मिकतेवर मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री एम टी गुजर यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची सुरेख शोभा वाढवली. महिला भगिनींचीही मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *