राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील अध्यक्ष व सचिवांचा परिसंवाद
![]()
राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील अध्यक्ष व सचिवांचा परिसंवाद
नवी दिल्ली : – व्हॉइस ऑफ मीडिया व व्हि ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या येथील दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात विविध राज्यातील अध्यक्ष व सचिव यांच्या परिसंवादात पत्रकार आणि पत्रकारिता ह्या विषयावर मंथन करण्यात आले.
या परिसंवादात महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, उत्तर प्रदेशचे प्रेम पाठक, गुजरातचे हितेश मारू, आसामच्या स्वपना दत्ता, नागालँडचे मॅक्स खिया, पुडूचेरीचे एम कार्तिकेय, ओरिसाचे प्रवातकुमार मिश्रा, राजस्थानचे गोपाल गुप्ता, त्रिपुराचे कौशिक अधिकारी, जम्मू काश्मीरचे अक्षित महाजन, दिगंबर महाले आदि विविध राज्याचे अध्यक्ष व सचिव सहभागी झाले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्हॉइस ऑफ मीडिया राज्यात एका पंचसूत्रीखाली उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील हा पॅटर्न संपूर्ण देशात राबविण्याचा मानस व्यक्त केला. हरियाणाचे बन्सीलाल पांचाल यांनी व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यात पत्रकारांसाठी अनेक आंदोलन करीत मोठं काम उभं केल्याचे यावेळी स्पष्ट केले. अध्यक्ष आणि सचिव यांच्या परिसंवादात महिला विंगच्या रश्मी मारवाडी, सविता चंद्रे, स्वप्ना दत्ता यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध मुद्द्याना वाचा फोडून त्यावर मंथन करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.


