राष्ट्रीय अधिवेशनात संघटना बांधणी कौशल्यावर मार्गदर्शन
![]()
राष्ट्रीय अधिवेशनात संघटना बांधणी कौशल्यावर मार्गदर्शन
नवी दिल्ली : – राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात काऊन्सलिंग फिजीओलॉजिस्ट उर्जा पाटील यांनी संघटना बांधणी कौशल्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हि ओ एम इंटरनॅशनल फोरमचे येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विविध राज्यातील अध्यक्ष व सचिव सहभागी झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात काउन्सलिंग फिजीओलॉजिस्ट ऊर्जा पाटील यांनी संघटना बांधणी कौशल्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी journey to synergy याविषयी विविध गेम्सच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक पातळीवरील टीम वर्कचे महत्व समजावून सांगितले. यासोबतच life skills and grounds rulls याविषयी मार्गदर्शन केले.

