दिल्लीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन,  देशभरातील विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष व सचिवांचा सहभाग  ,पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर मंथन
1 min read

दिल्लीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन, देशभरातील विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष व सचिवांचा सहभाग ,पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर मंथन

Loading

दिल्लीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन

देशभरातील विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष व सचिवांचा सहभाग

पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर मंथन

नवी दिल्ली : – येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आज व्हॉईस ऑफ मीडिया आणि इंटरनॅशनल फोरमच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उदघाटन सत्राला राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय संयोजक अशोक वानखेडे, पांडेचरी विधानसभा अध्यक्ष एम्बलाम सेलवन, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, व्यंकटेश जोशी, अनघा सराफ, राष्ट्रीय प्रमुख गगन महरोत्रा, डॉ पंजाब खानसोले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर मंथन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय संयोजक अशोक वानखेडे यांनी बोलताना पत्रकारिता क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत, संघर्ष आहे. या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय प्रमुख गगन महरोत्रा यांनी पॉझीटिव्ह जर्नलीसम या विषयावर मार्गदर्शन केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी व्हॉइस ऑफ मीडिया ही एक प्रगल्भ संघटना असून महाराष्ट्रातील संघटन मजबूत असल्याचे यावेळी सांगितले. पत्रकारांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी या मिळायलाच पाहिजे, मी सदैव आपल्या संघटनेच्या पाठीशी असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असलेले डॉ पंजाब खानसोले व सहकार क्षेत्रातील योगदानासाठी आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या अध्यक्ष अनघा समीर सराफ यांचा सत्कार करण्यात आला. पॉंडेचरी विधानसभा अध्यक्ष एम्बलम सेलवन यांच्या मनोगतानंतर राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचा समारोप करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्हॉईस ऑफ मीडियाने राज्यात पत्रकारांसाठी राबविलेला पॅटर्न संपूर्ण देशात राबविण्याचा मानस व्यक्त केला. व्हॉइस ऑफ मीडियाने महाराष्ट्रात एका पंचसूत्रीखाली संघटनात्मक पातळीवर एक रोल मॉडेल उभे केले आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण देशात पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, आसाम, ओरिसा, जम्मू काश्मीर, नागालँड, राजस्थानचे प्रदेश अध्यक्ष तसेच महिला विंगच्या महाराष्ट्र अध्यक्ष रश्मी मारवाडी, सविता चंद्रे, दमयंती जगताप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *