ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित*
1 min read

ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित*

Loading

*पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित*

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – वयाची सत्तरी गाठत असलेले येथील वरिष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी अकोल्याचे भगवंतराव इंगळे नामक राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्गच्या बैठकीत घोषित केला आहे. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईला जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यांत प्रथम पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना घोषित आहे. याव्यतिरिक्त अन्य ७ पुरस्कार्थींचा समावेश आहे.

ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांचे शिक्षण बी.एस्सी(केमिस्ट्री) आणि बी.ए.(सायकॉलॉजी) तसेच
पत्रकारितेची(पदविका) पर्यंतचे झाले आहे. त्यांनी पत्रकारितेचा आरंभ १९७८ साली धुळ्याला दै. स्वतंत्र भारत पासून केला. त्यानंतर दै.आपला महाराष्ट्र नंतर दै.वार्ता चे
उपसंपादक म्हणून ह्या जिल्हा दैनिकांमध्ये एकूण १३ वर्षे काम केले. मग त्यांनी स्वतःचे साप्ताहिक दीनानाथ ३ वर्षे चालविले. आणि पुढे दै. लोकमतच्या जळगाव आवृत्तीत अमळनेर विभागाची सलग २८ वर्षे पत्रकारिता त्यांनी केली. आणि अलीकडे १० वर्षे झाले ते स्व. व.ता.आबांच्या दै.पुण्य प्रताप चे ब्रँड अंबेसॅडर म्हणून चोख जबाबदारी सांभाळत आहेत. पांडुरंग पाटील यांना पत्रकारीतेचा ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना राजकारण, समाजकारण, शैक्षणिक तसेच सगळ्याच विषयांचे आकलन आहे.स्फूट लिखाणातून त्यांनी वेळोवेळी ते सिद्ध केले आहे. डिजिटल युगात सुद्धा ते प्रिंट मिडीया ते भक्कमपणे हाताळत आहेत.

गेल्यावर्षी धुळ्याचे जेष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना आणि त्याच्या आदल्या वर्षी धुळ्याचे गो पि लांडगे यांना अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. त्या द्वयांनी अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांचे नूतन घोषित पुरस्कारार्थी म्हणून त्यांचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *