अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य
1 min read

अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य

Loading

अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य

अमळनेर प्रतिनिधी: भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी शिवसेना तसेच समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने २१ रोजी शहरात काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेने शहरात नवचैतन्य पसरले होते. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेला मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळी ९ वाजता तिरंगा चौकातून राज्यगीत सादर करुन भव्य तिरंगा रॅलीचा शुभारंभ झाला.
यावेळी तालुका प्रमुख सुरेश अर्जून पाटील, शहर प्रमुख संजय कौतिक पाटील तसेच माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याहस्ते माजी सैनिकांचा तसेच शहीद जवान विलास पाटील यांच्या सौभाग्यवती छाया पाटील यांचा सन्मान करण्यात आला. रॅलीमध्ये अनेकांच्या हाती लहान मोठे तिरंगा ध्वज फडकत होते. ओपन जिप्सीवर माजी सैनिक तिरंगा ध्वज हाती घेऊन रॅलीचे संचलन करीत होते. डिजेवरील देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य पसरले होते.

 

 

 

 

तिरंगा चौकापासून सुरुवात झालेल्या रॅलीची सांगता महाराणा प्रताप चौकात राष्ट्रगीताने झाली. यावेळी उपस्थितांनी देशाप्रती नारे देऊन परिसर दणाणून सोडला.
रॅलीत सुभाष चौधरी, शिवाजी पाटील, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, माजी सरपंच रवींद्र पाटील, उपशहर प्रमुख प्रविण पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, परेश शिंदे, प्रा. दिनेश शेलकर, अशोक पाटील, अमित ललवाणी, शाम पाटील, पृथ्वीराज पाटील, अनिल पाटील, रणजित पाटील, रितेश बोरसे, सुंदरपट्टीचे प्रेमराज पाटील, खानदेश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी, राजेंद्र यादव, धनराज पाटील, महेंद्र बागुल, जगदीश पाटील, नितीन देवरे, गणेश कुरकुरे, नरेश पाटील, गणेश पाटील तसेच शिवसेना शाखा प्रमुख व बुध प्रमुख आणि तालुक्यातील देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले तर आभार आशिष चौधरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *