आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती, सत्कार सोहळा संपन्न
![]()
आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती, सत्कार सोहळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी – अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरीमध्ये आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या टीमचा आदर-सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष रियाज़ शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणावरचे विचार चर्चिले:
“शिका, संघठित व्हा आणि संघर्ष करा. अन्याय होणार्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शिक्षण हे अंधारातली रौशनी आहे आणि तेच मायबापांचा सन्मान करण्याचा मार्ग आहे.”
आप्पा दाभाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, “प्रयत्न करणाऱ्याची कधीच पराभव होत नाही. डॉ. बाबासाहेब म्हणतात, दोन रुपयांपैकी एक भाकरीसाठी आणि दुसरा पुस्तकासाठी वापरा. वाचनाला एवढे महत्त्व दिलेले समजून घ्या.”
समाजिक कार्यकर्ता भरत बोरसे यांनी युगानुरूप तंत्रज्ञानाबाबत सजग रहाण्याचे आवाहन केले आणि बदल स्विकारण्याचा आग्रह धरला.
अध्यक्ष स्थानी जहुर मुतवल्ली, आभार प्रदर्शन राजु शेख हाजी अलाउद्दीन मिस्री,यांनी केले या वेळेसे गोरख महाराज, पत्रकार प्रविण बैसाने, संतोष संदानशिव, प्रभाकर पवार,बाळु जमादार,रवि भाऊ भिल, प्रकाश भाऊ भिल,युसूफ पेंटर,अमजदअली शाह,मुकतार मिस्री, शाहरुख सिंगर, फारुख खाटीक, आकिब अली, आदि मान्यवर उपस्थित होते

