अमळनेर प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरली; ट्रॅक खराब, वाहतुकीवर परिणाम  अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक ठप्प
1 min read

अमळनेर प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरली; ट्रॅक खराब, वाहतुकीवर परिणाम अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक ठप्प

Loading

अमळनेर प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरली; ट्रॅक खराब, वाहतुकीवर परिणाम

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक ठप्प

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची गंभीर घटना १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट आणि गार्ड या दोघेही सुरक्षित आहेत.
मालगाडीच्या काही डब्ब्यांच्या खाली पडल्यामुळे आसपासच्या ट्रॅकचे नुकसान झाले असून, परिणामी सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे अधिकाऱ्यांनी त्वरित तैनात होऊन दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. तथापि, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास संकोच केला आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत क्षमायाचना केली असून, लवकरच वाहतूक सुरळीत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. घटनास्थळी काम जोरात चालू असून, प्रवाशांनी वैकल्पिक मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *