ग्रामीण विकास ही योजना नव्हे, तर लोक सहभागातून घडणारी चळवळ आहे” – डॉ. अविनाश जोशी,  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना”विषयावर व्याख्यान; लोंढवे येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
1 min read

ग्रामीण विकास ही योजना नव्हे, तर लोक सहभागातून घडणारी चळवळ आहे” – डॉ. अविनाश जोशी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना”विषयावर व्याख्यान; लोंढवे येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

Loading

ग्रामीण विकास ही योजना नव्हे, तर लोक सहभागातून घडणारी चळवळ आहे” – डॉ. अविनाश जोशी

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना” विषयावर व्याख्यान; लोंढवे येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
ग्रामपंचायत लोंढवे व स्व. आबासो.एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे यांच्या वतीने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ‘ग्रामीण भागातील विकास वाटा’ या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांचे सखोल मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र बोरसे होते.
प्रास्ताविक सेवानिवृत्त केद्रप्रमुख बन्सीलाल भागवत यांनी केले.
मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, सरपंच सौ. भारती बहिरम, अशोक शालीग्राम पाटील, यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना शाळेच्या शैक्षणिक आणि सांघिक प्रगतीची माहिती देण्यात आली.
विद्यार्थिनी जागृती बाळासाहेब पाटील हिने मनोगत व्यक्त करून आपल्या यशाचा प्रवास कथन केला.

डॉ. अविनाश जोशी यांनी ग्रामीण विकासाच्या संदर्भात सांगितले की,

> “ग्रामीण विकास ही केवळ सरकारी योजना नव्हे, ती जनसहभागातून घडणारी चळवळ आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, पाणी व्यवस्थापन, आणि पर्यावरण यांचा समन्वय साधत गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो.”

 

त्यांनी पंचायत राज, महिलासक्षमीकरण, कृषी विकास, पायाभूत सुविधा, आणि सामाजिक न्याय यासारख्या विविध पैलूंवर मुद्देसूद भाष्य केले.

मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी शाळेच्या आणि गावाच्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रम अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सतत प्रगतीचा मंत्र दिला.या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचलन मिलिंद पाटील यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *